Wednesday, January 14, 2026

Date:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री, वयाच्या ८२व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास

- Advertisement -

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे ): काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज (६ जानेवारी) पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपले आहे.

कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले. पुण्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. जनसंपर्क, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक व्यवस्थापन यांमुळे ते अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक काळ असा होता की पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांचे नाव केंद्रस्थानी होते.

मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसला. आयोजन समितीचे अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती.

तरीही त्यानंतर कलमाडी यांना पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होता आले नाही. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...