Wednesday, February 11, 2026

Date:

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्म तसेच स्थानकाबाहेरील परिसरात कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. अचानक हल्ला किंवा चावण्याच्या घटनांची शक्यता नाकारता येत नसल्याने संभाव्य अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या या महत्त्वाच्या स्थानकावर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

कुत्री चावल्यामुळे रेबीजमुळे नुकताच एका तरुणाचा जीव गेला, ही घटना ताजी असतानाच, पुणे विमानतळासह पुणे रेल्वे स्थानकावर देखील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याकडे स्थानिक सुरक्षा एजन्सीसह पुणे महानगर पालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याचेही समोर आले आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...