Tuesday, February 3, 2026

Date:

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

- Advertisement -

“हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

विषय हार्ड न्युज,मुंबई | दि. ३१ जानेवारी २०२६ :
कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

या अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात, अजितदादांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज खासदारकीचा राजीनामा देत लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा प्रसंग कोणत्याही अर्थाने आनंदाचा नसून, तो जबाबदारीचा, कर्तव्याचा आणि सेवाभावाचा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी पुढे येणे हे मोठ्या धैर्याचे आणि मानसिक बळाचे द्योतक आहे. कैलासवासी अजितदादांच्या कार्याचा, विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्राताई पवार यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, सौ. सुनेत्राताई पवार यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ईश्वर त्यांना हे दायित्व पेलण्याची शक्ती देवो, अशी भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...

आता दादा नाहीत… पण त्यांचे शब्द आजही कार्यकर्त्यांना दिशा देत आहेत

नवनाथ पारगेनी दिलेला शब्द खरा होणार; कार्यकर्त्यांचा निर्धार अधिक...