


हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद!
विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर : हवेली पश्चिम भागातील जिल्हा परिषद खेडशिवापूर–खानापूर गट निवडणुकीत प्रथमच पश्चिम भागातील स्थानिक, सुशिक्षित व अभ्यासू युवा चेहऱ्याला संधी मिळाल्याने संपूर्ण भागात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुजा नवनाथ पारगे यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्य जनतेत नव्या आशेचा संचार झाला आहे.
गेल्या दहा वर्षांत पश्चिम भागात विकासकामांचा धडाका लावत, सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षाचा विश्वास दाखवला असून, त्याच विश्वासाला बळ देण्यासाठी पुजा नवनाथ पारगे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
त्या संधीचे सोने करण्याचा निर्धार पश्चिम भागातील जनतेने केला असून, जिल्हा परिषद सभापतीपदासाठी सक्षम, अभ्यासू व तरुण नेतृत्व म्हणून पुजा नवनाथ पारगे यांच्याकडे पाहिले जात आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटील राजकारणाला छेद देत, विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन त्या रिंगणात उतरल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या गैरसोयी, आरोग्य सुविधा, शेतीविषयक प्रश्न असोत किंवा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेली कामे असोत—प्रशासनाला जागं करून काम करून घेणारी निस्वार्थ भूमिका पुजा नवनाथ पारगे यांनी सातत्याने बजावली आहे. त्यामुळेच “काम करणारी माणसं” म्हणून त्यांच्यावर जनतेचा ठाम विश्वास आहे.
भागाचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी पश्चिम भागाचा भूमिपुत्रच नेतृत्व करावा, या भूमिकेतून संपूर्ण गटातील जनता एकवटली आहे. हुकूमशाही व दडपशाहीला आळा घालण्यासाठी यावेळी ‘घड्याळ’ हेच चिन्ह निवडण्याचा निर्धार मतदारांनी केला असून, पश्चिम भागात ‘घड्याळ’ जोरात वाजणार हे निश्चित मानले जात आहे.
