


विषय हार्ड न्यूज, नऱ्हे,पुणे :
नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण आणि वाहतूक सुरक्षेचा संदेश देणारा सामाजिक उपक्रम रविवारी पुण्यात राबविण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ फाऊंडेशन, व्यंकटसाई होंडा सेल्स अँड सर्व्हिस तसेच पत्रकार विठ्ठल तांबे आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

सातारा टोल रोडच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेअंतर्गत रविवारी (दि. 14 डिसेंबर 2025) सकाळी 10.30 वाजता आशीर्वाद हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवरील सेल्फी पॉइंट परिसरात वृक्षारोपण व मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला. या वेळी रस्त्याच्या कडेला विविध देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यासोबतच दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करणे, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाले, राजेश बोबडे, कैलास गुरव, योगेश टेकवडे, गोपीनाथ गुजर, रोहिदास जोरी, संतोष कदम (व्यंकटसाई होंडा), तानाजी कांबळे,जय पिल्लाई, सुनील पिल्लाई, मोहित भगतकर, माणिक दिवटे, विजय शिळीमकर, सोपान हेगडे, दत्तात्रय मुळूक, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ फाऊंडेशनचे सदस्य तसेच महामार्ग गस्त पथकातील कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत गायकवाड, अमोल भोरे, सम्राट शिंदे, वैभव पाटील, गुणीलाल ठाकूर आणि सुरेंद्र कुमार यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

