Thursday, January 15, 2026

Date:

नवले ब्रिजजवळ भीषण साखळी अपघात; फॅमिली कार जळून खाक, आठ जणांचा होरपळून मृत्यू व १५ ते २० जखमी….

- Advertisement -

पाच पुरुषांसह दोन महिला व एका लहान बाळाचा होरपळून मृत्यू..

विषय हार्ड न्यूज, पुणे१३नोव्हेंबर २०२५: नवले ब्रिज परिसरात गावजी हॉटेलच्या समोर गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात सात ते आठ वाहनांचा सहभाग असून दोन कंटेनरच्या मधोमध अडकलेली एक फॅमिली कार अक्षरशः जळून खाक झाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १५ ते २० लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले आहे. अग्निशमन दलाचे जवान जळालेल्या वाहनातून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.


दरम्यान, सिंहगड रोड पोलिस ठाणे तसेच सिंहगड वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व वाहने साताऱ्याकडून पुण्याकडे येत होती. अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून घटनास्थळी अफरातफरचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...