Thursday, January 15, 2026

Date:

दुर्गम डोंगरात ‘खरी दिवाळी’ — मैत्री चाय कट्टा ग्रुपचा मानवतेचा उजेड..

- Advertisement -

माणुसकी जपणारी माणसं — सिंहगड रोड, गोयलगंगा, वडगाव – पुणे.

पानशेत परिसरातील शंभर आदिवासी कुटुंबांपर्यंत ‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून दिवाळी किट वितरण…

विषय हार्ड न्युज,पुणे :
सिंहगड रोड, गोयलगंगा वडगाव परिसरातील “मैत्री चाय कट्टा ग्रुप पुणे” या सामाजिक संस्थेने यंदाही दिवाळी साजरी करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. 

     “एक_हात_मदतीचा” या संकल्पनेतून ग्रुपच्या सदस्यांनी पानशेत परिसरातील निळकंठेश्वर, उरण, वरसगाव, पाबेघाट या अती डोंगराळ भागांतील आदिवासी व कातकरी बांधवांच्या वसाहतींना भेट देऊन त्यांच्यात दिवाळीचा आनंद वाटला.
या भागांमध्ये अद्याप शासनाच्या वीज, पाणी, रस्ता आदी मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अशा परिस्थितीतही आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करणाऱ्या या बांधवांनीही दिवाळी साजरी करावी, या भावनेतून ग्रुपने सुमारे शंभर कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप केले.

या किटमध्ये चिवडा, लाडू, चिकल्या, शंकरपाळी, गोडेतेल, डाळ, शेंगदाणे, रवा, साखर, कोलगेट, ब्रश, पावडर, खोबरेल तेल, लहान मुलांसाठी कपडे व चप्पल, महिलांसाठी साड्या आणि ब्लँकेट अशा विविध वस्तूंचा समावेश होता.
ग्रुपच्या सदस्यांनी सर्व वस्तू स्वतः खरेदी करून डोंगरदऱ्यांत नेऊन वाटप केले. या उपक्रमाद्वारे माणुसकीचा उत्सव साजरा करत “खरी_दिवाळी” साजरी केली गेली.
“माणुसकी जपणारी माणसं — हाच आमचा दिवाळीचा आनंद,”

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...