


विषय हार्ड न्युज,पुणे :
संगीत क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करून रसिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तरुण संगीतदिग्दर्शक श्रेयस देशपांडे यांना ‘महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आणि We Captures Entertainments यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलाकार टॅलेंट कट्टा या उपक्रमांतर्गत दिला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घुले रोड, छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे.
श्रेयस देशपांडे यांनी अल्पवयातच संगीत क्षेत्रात कार्य सुरू केले. त्यांच्या ‘अवकारिका’ (२०२४) या चित्रपटातील संगीतामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी सुनिधी चौहान आणि कैलाश खेर यांसारख्या ख्यातनाम गायकांसोबत काम केले आहे.
त्यांनी ‘धिष्कावू’ (२०२३), ‘कसपाट’ (२०२२), ‘बैलगाडा शर्यत’ (२०२३), ‘अखंड भारत’ (२०२२) या चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच MX Player वरील वेबसीरिज आणि बॉलिवूडमधील ‘सुधागड’ (२०२४) या चित्रपटासाठीही त्यांनी संगीतबद्ध केले आहे.
त्यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये Kesariyā (Marathi Version – Brahmastra), Naad Ekach Bailgade Sharyat, Lehrayega Tiranga (Hindi), Punyatlo Love Story, Bedhund Me, आणि Raho Me Teri या गाण्यांचा समावेश आहे.
देशपांडे यांनी कैलाश खेर, सुनिधी चौहान, सोनू निगम, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, मुग्धा करहाडे यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत तसेच जॉन इब्राहिम, अमोल कोल्हे, उपेंद्र लिमये, श्रुती मराठे, समीर धर्माधिकारी आणि संतोष जुवेकर या कलाकारांसोबतही काम केले आहे.
‘लेहरायेगा तिरंगा’ या देशभक्तिपर गाण्याच्या मराठी आवृत्तीसाठी त्यांना CSR Best Music Director Award 2023 मिळाला, तर ‘Untold Story’ या शॉर्टफिल्मसाठी Pune International Film Festival Award प्राप्त झाला आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, IPS कृष्णा प्रकाश आणि माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विशेषतः केला आहे.
श्रेयस देशपांडे हे Shreyas Records या स्वतःच्या म्युझिक लेबल कंपनीचे संस्थापक आहेत. ते नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि संधी देण्याचे कार्य करत आहेत.
‘महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार’ हा राज्यभरातील कला आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना दिला जाणारा सन्मान आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे श्रेयस देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि सृजनशीलतेचा गौरव मानला जात आहे.
