


नारायणराव सणस विद्यालयात ३५ संगणकांसह अत्याधुनिक ए.आय. लॅब..

विषय हार्ड न्युज,धायरी (प्रतिनिधी) — महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त व स्वर्गीय अनिलआण्णा सणस यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नारायणराव सणस विद्यालय, वडगाव खुर्द (रयत शिक्षण संस्था) येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
१९६० साली कर्मवीर अण्णाभाऊ साठे यांच्या काळात स्थापन झालेल्या या विद्यालयात सध्या सुमारे २,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सिंहगड रस्ता, दांडेकर पूल, खानापूर, धायरी, नरे, आंबेगाव, हिंगणे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला आणि आसपासच्या भागातील बहुजन समाजातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. या शाळेतून अनेक विद्यार्थी वकील, अभियंते तसेच शासकीय उच्चपदांवर विराजमान झाले आहेत.
सणस कुटुंबियांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता लॅबमध्ये ३५ संगणकांची सोय करण्यात आली आहे. भावी पिढीला तंत्रज्ञानसाक्षर करण्याच्या दिशेने ही महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.
उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य विभावरी सणस, राणोजी अण्णा पोकळे, चंद्रशेखर पोकळे, बाळासाहेब पोकळे, अक्रूर कुदळे, प्राचार्य रोडे सर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, विभागीय अधिकारी संजय मोहिते तसेच प्रमुख वक्ते प्रशांत खामकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सणस कुटुंबीयांनी केले असून नारायणराव सणस विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्तम नियोजन केले.

