विषय हार्ड न्युज पुणे : चेन्नई येथील नेहरू इंडोर स्टेडियममध्ये २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग चिल्ड्रन अँड कॅडेट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत पुण्याचा चैतन्य रूपाली नीलकंठ लांडगे याने चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राचा गौरव वाढविला.
आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूलचा ११ वर्षांचा विद्यार्थी चैतन्य लांडगे (इयत्ता ६ वी) याने २८ किलो वजनी गटात किक लाईट प्रकारात सुवर्ण पदक तसेच लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात रौप्य पदक जिंकले. या दोन पदकांमुळे चैतन्यने राज्याचा नावलौकिक वाढविला.
या यशामागे प्रशिक्षक ओंकार राठोड, तेजस यादव आणि वेदांत दीक्षित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण ४८ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ६७ कांस्य पदके मिळवून १५४ पदकांसह महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला.
Date:
राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या चैतन्य लांडगेचे यश.
- Advertisement -