विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर फलद्रुप ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करत जीआर काढण्याचा निर्णय घेतला असून काही महत्त्वाच्या मागण्यांवर वेळेची मुदत घेतली आहे.

मान्य झालेल्या मागण्या.
• हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी – नातेसंबंध, गावकुळ तपासून कुणबी प्रमाणपत्र देणार.
• आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना मदत – आर्थिक मदत + सरकारी नोकरीची हमी.
• आंदोलकांवरील गुन्हे मागे – सप्टेंबर अखेरपर्यंत निपटारा.
• जात पडताळणीची प्रक्रिया सुधारणा – प्रलंबित दाखले तातडीने निकाली काढणार.
• आरक्षणाचा मार्ग खुला – कायद्यात बसणारे स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी सकारात्मक निर्णय.
• प्रलंबित मागण्या.
• सातारा गॅझेट (औंध गॅझेट) अंमलबजावणी – १५ दिवस ते १ महिन्यात निर्णय.
• ‘मराठा-कुणबी एकच’ जीआर – किचकट बाब, २ महिन्यांची मुदत घेतली.

निष्कर्ष
सरकारने ६ प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत तर २ महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित असून त्यासाठी वेळ घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे ऐतिहासिक यश ठरल्याचे सांगत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.