Monday, March 2, 2026

Date:

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

- Advertisement -

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम
• संतोष मोतीलाल परदेशी परिवाराची मेहनत भाविकांच्या हृदयाला भिडली,“संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अनोखा देखावा साकार”.

विषय हार्ड न्युज, पुणे: गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो.

       पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा हा देखावा भक्तांच्या मनात अध्यात्माची नवी जागृती करतो. संस्कृती व अध्यात्माचे सुंदर मिश्रण असलेला हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
परदेशी परिवाराने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून, ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेचा हा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 पत्ता : रामकृष्ण हरीपत्ता क्र. ६१४, ओरिएंटल कॉम्प्लेक्स, चौथा मजला, शाहू चौक गणपती मंदिराशेजारी.
 संपर्क : ९८२३११२३२३

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...