Saturday, August 30, 2025

Date:

“शेतीला नवा श्वास : आळते–कार्वे दरम्यानचा अतिक्रमित शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने खुला”.

- Advertisement -

सरपंचांच्या सहकार्याची प्रशंसा; शेतकऱ्यांना दिलासा

विषय हार्ड न्युज तासगाव, सांगली ,२४ जुलै २०२५ :
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आळते आणि खानापूर तालुक्यातील कार्वे गावांदरम्यानचा अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद पडलेला शीवरस्ता अखेर खुला झाला आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने आणि दोन्ही गावांच्या सरपंचांच्या सहकार्याने झालेल्या या कामगिरीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

*काय आहे रस्त्याचे महत्त्व?
• हा सुमारे २ किमी लांबीचा रस्ता खानापूर–तासगाव मुख्य रस्त्यापासून सुरू होऊन ओढ्यापर्यंत जातो.
• अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्याने तो बंद होता.
• परिणामी, शेतकऱ्यांना शेतात जाणे, अवजारे व वाहने नेणे, उत्पादन बाहेर नेणे यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या.
• उत्पन्नावरही त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत होता.

* प्रशासनाचा पुढाकार आणि सहमतीचे यश
• रस्त्याची सरकारी आणि खाजगी मोजणी झाल्यानंतरही एकमताचा अभाव होता.
• डॉ. पुलकुंडवार यांनी दोन्ही गावांचे सरपंच — आळतेचे बालाजी मोहिते आणि कार्वेचे बाळासो जाधव — यांच्याशी चर्चा करून रस्ता खुला करण्यासाठी पुढाकार घेतला.
• शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्याने हा मार्ग खुला होऊ शकला.

*प्रशासनाचे आवाहन.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की,
“इतर गावांतील शेतकऱ्यांनीही अशीच सकारात्मक भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीने अडथळे आलेले रस्ते खुला करावेत व त्या रस्त्यांची नोंद ७/१२ वर करावी.”

*उपस्थित मान्यवर.
या रस्ता उघडण्याच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे, विटा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, शेतकरी प्रतिनिधी अमित पाटील, रोशन जाधव, तसेच आळते गावचे माणिक सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...

धायरी व आंबेगाव येथे गौराई साडी ड्रेपिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विषय हार्ड न्युज,धायरी, ता. पुणे – गौरी-गणपती उत्सवानिमित्त महिलांमध्ये...

नवले ब्रिजवर कोंडीत अडकलेले पुणेकर; रखडलेल्या कामावरून नागरिकांचा संताप उसळला.

विषय हार्ड न्युज,पुणे १८– नवले ब्रिज परिसरात रखडलेले बायपासचे...