कोथरूडमध्ये भाजपचा महारक्तदान संकल्प यशस्वी; १००० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग.
विषय हार्ड न्युज, बालेवाडी,पुणे :
राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, समाजसेवेचा माध्यम असू शकते, याचे उत्तम उदाहरण ठरले आहे भाजपा कोथरूड उत्तर मंडळाने आयोजित केलेले “महारक्तदान संकल्प शिबिर”.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात १०१४ युनिट रक्त संकलित करून सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

*उपक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये:
• १०१४ रक्त युनिट्स संकलित होऊन पुण्यातील एक दिवसात झालेले हे एक विक्रमी रक्तसंकलन.
• बालेवाडी, पाषाण, सुस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
• धीरज घाटे, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, हर्षदा फरांदे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेरणा.
• “सेवा हाच धर्म” या मूल्याचा प्रचार आणि प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली भावना.
• लहू बालवडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उत्कृष्ट समन्वय.
*संघटनांची भूमिका ठळक:
• भाजपच्या महिला मोर्चा व युवा मोर्चाने विशेष भागीदारी घेत रक्तदात्यांमध्ये जनजागृती केली.
• माजी नगरसेवक अमोल बालवडकर,पुनीत जोशी, स्वप्नाली सायकर, यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांची मेहनत.
• महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रियंका पेंडसे, स्मृती जैन, उमा गाडगीळ, प्रगती निसाळ यांचा सक्रिय सहभाग.
* कार्यक्रमाचे सामाजिक परिमाण:
• रक्तदान म्हणजे फक्त एक सेवा नव्हे तर जीवनदान!
• गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी यासाठी नागरिकांचा योगदान देण्याचा प्रेरणादायी आदर्श.
• राजकीय पक्ष सामाजिक जाणीवेने काम करू शकतो, याचा सकारात्मक संदेश.