Friday, September 5, 2025

Date:

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

- Advertisement -


नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक कारवाई; आरोपी अटकेत, साथीदार फरार.

विषय हार्ड न्युज,पुणे, १७ जुलै २०२५:
गे डेटिंग अ‍ॅपवर प्रेमाचा साज चढवून मैत्री केली, त्यानंतर तरुणाला गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेलं, त्याच्यावर अश्लील कृत्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओ शूट केला. ‘नाही’ म्हटल्यावर कपडे जबरदस्तीने काढले गेले आणि तो व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत ऑनलाईन 10 हजार रुपये उकळण्यात आले. नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकारात मुख्य आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी पसार आहे.
रॉबिन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय २७, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, ओंकार मंडलिक या साथीदाराचा शोध सुरू आहे.
立 ओळख टींडरवर, प्रेमाचं रूप घेऊन जाळं
फिर्यादी तरुणाची आरोपीशी टींडर या गे डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली होती. मैत्री वाढवत, विश्‍वास संपादन करत आरोपीने तरुणाला नांदेड सिटी गेटजवळ भेटायला बोलावलं. त्याला गाडीत बसवून प्रयेजा सिटीजवळील एका मोकळ्या मैदानात नेण्यात आलं.

अश्लील व्हिडिओचा सापळा आणि ब्लॅकमेलिंग .
तिथे आरोपीने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर जबरदस्तीने तरुणाचे कपडे काढून त्याचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्या व्हिडिओचा वापर करून नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने साथीदाराच्या मदतीने पीडिताच्या मोबाईलमधून ऑनलाईन १०,००० रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

पोलिसांची धाडसी कारवाई – आरोपी जेरबंद.
पीडित तरुणाने घाबरत असतानाही नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाडसाने तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार प्रतिक मोरे व स्वप्नील मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रॉबिन कांबळेला अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
या संपूर्ण कारवाईचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी मार्गदर्शन केलं.
कारवाईत सहभागी झालेले अधिकारी व कर्मचारी म्हणजे –
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, स्वप्नील मगर, प्रतिक मोरे, संग्राम शिनगारे, राजु वेगरे, शिवाजी क्षिरसागर, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, निलेश कुलथे, उत्तम शिंदे, निलेश खांबे, गांगुर्डे, सतीश खोत, विशाल तांबे.

सामाजिक इशारा:
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सवर “फसवणुकीचे” प्रकार वाढले आहेत. आंधळ्या विश्‍वासाने कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये. संशयास्पद वर्तन दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या चैतन्य लांडगेचे यश.

विषय हार्ड न्युज पुणे : चेन्नई येथील नेहरू इंडोर...

मराठा आरक्षण संघर्षाला यश : मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य, काहींवर मुदत.

विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे...

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...