कुशल करेवार अध्यक्षपदी; अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन, समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प.
विषय हार्ड न्युज,पुणे, १३ जुलै २०२५:
रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आज स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी विशेष सरकारी वकील आणि राज्यसभा खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली. समारंभाचे उद्घाटन रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अॅड. उज्ज्वल यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, श्री लाक्ष्मीकृपा अर्बन बँकेचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात कुशल करेवार यांनी नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. अमित झगडे यांनी सचिव तर दीपक व्यवहारे यांनी खजिनदारपदाची सूत्रे हाती घेतली. नव्या कार्यकारिणीने येत्या वर्षभरात शैक्षणिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष अतुल कारले यांनी सर्व मान्यवर, सदस्य आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
ठळक मुद्दे:
अॅड. उज्ज्वल निकम यांचा उत्स्फूर्त सहभाग
नवीन कार्यकारिणीकडून सामाजिक बदलाचे आश्वासन
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास लाभदायक
रोटरी क्लबच्या नव्या टिमकडून सामाजिक भान जपत पुढाकार घेण्याचे संकेत.