विषय हार्ड न्युज,महाड (प्रतिनिधी):
महाड तालुक्यातील कोळोसे गावात कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली येथील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबवला.
या कार्यक्रमात कृषीदूतांनी ग्रामस्थांना कृषीदिनाचे महत्त्व समजावले तसेच ‘कृषीदूत’ म्हणजे काय, याचे सुलभ मार्गदर्शन केले. गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. कृषी तज्ञांनी आधुनिक शेती, हवामान आधारित उत्पादन, सेंद्रिय शेती, आणि नवीन कृषी तंत्रज्ञान याविषयी उपयुक्त मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच संजना पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी आकाश रुपनर, पोलीस पाटील संदीप पाटील, मुख्याध्यापक बेले , ग्रामसेवक चंद्रकांत कदम यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, प्रा. व्ही. आर. पवार आणि प्रा. एस. एस. संकपाळ यांनी केले. शेवटी सर्व सहभागी कृषीदूतांनी गावात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
कृषीदूतांमध्ये गौरव विश्वकर्मा, मानव पाटील, रामचंद्र ठणके, रोहन चव्हाण, विपुल हगवणे, प्रतिक जाधव, युवराज सुर्यवंशी, समीर न्हावेलकर या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमामुळे कोळोसे गावात आधुनिक शेतीबाबत नवचैतन्य निर्माण झाले.
Date:
कोळोसे गावात कृषीदिनाचा उत्सव; आधुनिक शेतीचा नवा जागर, वृक्षारोपणाने समारोप!
- Advertisement -