Wednesday, September 3, 2025

Date:

शेतीला टेक्नॉलॉजीची नवी दिशा! पुण्याच्या ‘सेरेब्रोस्पार्क’ कंपनीच्या CS कृषी ड्रोनला केंद्र सरकारची मान्यता.

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,पुणे : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा नवा अध्याय लिहित, पुण्यातील सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या CS कृषी ड्रोन ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी घडामोड मानली जात आहे.

ड्रोनद्वारे फवारणी — जलद, सुरक्षित आणि किफायतशीर!
CS कृषी ड्रोनचा वापर शेतात औषध फवारणीसाठी केला जातो. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना वेळ, मजुरी, व पाण्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर होतो, तसेच विषारी औषधांमुळे शेतकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात येते. मात्र, या ड्रोनच्या मदतीने फक्त १० लिटर पाण्यात अवघ्या ५ ते ७ मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी शक्य होते. त्यामुळे वेळ, पाणी आणि मजुरीचा मोठ्या प्रमाणात बचाव होतो.
शासन मान्यता, अनुदान व कर्जसह रोजगाराची संधी
या ड्रोनला सरकारच्या कृषी अनुदान योजनेंतर्गत पात्रता लाभली असून, अधिकृत बँकांकडून कर्ज देखील मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी हा ड्रोन खरेदी करून ड्रोन फवारणी सेवा सुरू केल्यास त्यातून नव्या रोजगाराच्या संधी उभ्या राहू शकतात.
‘मेक इन इंडिया’चा आदर्श नमुना
CS कृषी ड्रोन हे संपूर्णपणे देशात तयार करण्यात आलेले उत्पादन असून, हे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांना चालना देणारे आहे.
शेतकऱ्यांनी आता पुढे येऊन या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित व आधुनिक शेतीच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन सेरेब्रोस्पार्क कंपनीकडून करण्यात आले आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

मराठा आरक्षण संघर्षाला यश : मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य, काहींवर मुदत.

विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे...

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...

धायरी व आंबेगाव येथे गौराई साडी ड्रेपिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विषय हार्ड न्युज,धायरी, ता. पुणे – गौरी-गणपती उत्सवानिमित्त महिलांमध्ये...