Friday, September 5, 2025

Date:

प्रामाणिक पत्रकारितेचा गौरव : राहुल कुलकर्णी यांना कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार.

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,नांदेड(प्रतिनिधी ):
सत्यशोधक आणि अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना यंदाचा कै.कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर नेमकेपणाने भाष्य करणाऱ्या, तसेच तथ्याधिष्ठित पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या कुलकर्णी यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ही निवड करण्यात आली आहे.
गेल्या २१ वर्षांपासून माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दैनिक ‘सत्यप्रभा’च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, १४ जुलै रोजी दुपारी ३.१५ वाजता, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड येथे होणार आहे.
पुरस्कार वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचा राज्यपाल म्हणून नांदेडचा हा पहिलाच दौरा असून, त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
राहुल कुलकर्णी यांच्यासह इतर मानकरी पुढीलप्रमाणे :
डॉ. सुरेश सावंत – जीवनगौरव पुरस्कार (साहित्य व शिक्षण क्षेत्रात योगदान)
डॉ. विपीन ईटनकर – जिल्हाधिकारी, नागपूर
संदीप पाठक – अभिनेते
डॉ. नितीन जोशी – पोटविकार तज्ज्ञ
पुरस्कार निवड समितीत डॉ. गोविंद नांदेडे, शंतनू डोईफोडे, धर्मराज हल्लाळे आणि सुनिल देवडा यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला आमदार बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर आणि आ. श्रीजया चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
राहुल कुलकर्णी यांना मिळालेला हा सन्मान सत्याशी निष्ठावान राहणाऱ्या पत्रकारितेचा ठसा उमटवणारा आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या चैतन्य लांडगेचे यश.

विषय हार्ड न्युज पुणे : चेन्नई येथील नेहरू इंडोर...

मराठा आरक्षण संघर्षाला यश : मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य, काहींवर मुदत.

विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे...

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...