विषय हार्ड न्युज,नसरापूर (प्रतिनिधी : राम पाचकाळे) –
भोर तालुक्यातील नसरापूर येथील शेटेआळी परिसरातून १२ वर्षांचा अनिकेत संदीप जाधव हा मुलगा दिनांक २६ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला आहे. त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
घटनेवेळी मुलाचे वडील संदीप जाधव आणि आई मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते, तर त्याची बहीण शाळेत होती. घराला कुलूप लावले होते, आणि त्याची चावी अनिकेतकडे होती. शाळेतून घरी परतल्यानंतर भावाचा कुठेही पत्ता लागला नसल्याचे लक्षात येताच बहिणीने पालकांना फोन करून माहिती दिली.
नंतर घरात परत आलेल्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र अनिकेत कुठेही आढळून आला नाही. अखेर राजगड पोलीस स्टेशन, कामठडी येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
• नाव: अनिकेत संदीप जाधव
• वय: १२ वर्षे
• वेषभूषा: पिवळ्या रंगाचे जर्किन, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे बूट
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागरिकांनी संबंधित मुलाबाबत कोणतीही माहिती असल्यास खालील नंबरवर तत्काळ संपर्क साधावा:
*राजगड पोलीस स्टेशन: 02113-272233
* ASI चव्हाण: 8329102030
* PSI पाटील: 9689814111
Date:
नसरापूरमध्ये १२ वर्षांचा मुलगा बेपत्ता; शेटेआळीतील घटना, पोलीस तपास सुरू.
- Advertisement -