Monday, March 2, 2026

Date:

हरिचंद्री गावात दुपारी बंद घर फोडले; ४.६० लाखांचे दागिने लंपास.

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,कापूरहोळ (ता.भोर) दि. २३ जून –हरिचंद्री गावातील गेस्टोन बिल्डिंग परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल रामराव कदम (वय ३२) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ जून रोजी दुपारी ३ ते सायं. ४.३० वाजण्याच्या दरम्यान, ते त्यांच्या घरी नसताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले.
चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये:
• सोन्याचे गंठण, कडे, अंगठ्या, लॉकेट-चेन, बाळ्या – ₹४,५६,०००/-
• चांदीचा कमरदोरा व पायातील चैन – ₹४,८००/-
• एकूण अंदाजित मालमत्ता – ₹४,६०,८००/-
या प्रकरणी गु.र.नं. २४७/२०२५, भादंवि कलम ३०५ व ३३१(३) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...