विषय हार्ड न्युज,पुणे (प्रतिनिधी):
धनकवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीच्या बैठकीत सोमवारी एक गंभीर प्रकार घडला. पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विभागप्रमुख उद्धव कांबळे हे स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी गेले असताना, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि त्यांचा मुलगा श्रीनिवास जगताप यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, जगताप पिता-पुत्रांनी “तुला सुट्टी देणार नाही”, “घोटाळे काढण्याचा प्रयत्न केलास तर संपवून टाकू” अशा शब्दांत धमकी दिली. उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाकडे उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
घटना इतकी गंभीर असताना अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, हे अधिकच चिंताजनक ठरत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Date:
पुणे शहरात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची शिवसेना(शिंदे गट)विभागप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी!
- Advertisement -