Monday, June 23, 2025

Date:

“हरिश्चंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं”

- Advertisement -

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून प्रेरणादायी उपक्रम.

हरिश्चंद्री (ता. भोर, जि. पुणे): शिक्षण हीच खरी समृद्धी आणि परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, हे अधोरेखित करणारा एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम हरिश्चंद्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडला. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ हरिश्चंद्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅग, वह्या व अक्षरलेखन पुस्तिका वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत उपस्थितांमध्ये उर्जा निर्माण केली. “शिक्षण हेच शस्त्र आहे आणि या शस्त्राच्या बळावर समाजात परिवर्तन घडवता येते,” असे उद्गार त्यांनी काढत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी दत्ता गाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गाडे, संदीप इंगुळकर (डेक्कन कोल्ड स्टोरेज), माजी सरपंच विकास गाडे, गजानन गाडे, अमृत पाचकाळे, गणेश गाडे, पत्रकार राम पाचकाळे, युवराज घोडके, तसेच अंगणवाडी सेविका स्वाती पाचकाळेसविता चाळेकर यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्य मिळताच उमटलेले निखळ आनंदाचे क्षण पाहून अनेक पालक आणि ग्रामस्थ भावविवश झाले. “ही केवळ वस्तूंची मदत नसून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यात उजेड देणारा विश्वास आहे,” असा सूर उपस्थितांमध्ये उमटला.
कार्यक्रमाची सांगता करताना सहभागी सर्वांनी एकच संकल्प केला :“गावाची खरी प्रगती हवी असेल, तर प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच हवं!”

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेड शिवापूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १७ जण अटकेत, २८ हजारांची रोकड जप्त

खेड शिवापूरचा 'जुगार अड्डा' उध्वस्त! १७ जणांना ताशाच्या दुनियेतून...

नांदगाव मोरीत मोटार अडकली, जीवितहानी टळली – भोर-हिर्डोशी मार्ग अपघाताच्या कचाट्यात; प्रशासनाची झोप उडणार कधी?

विषय हार्ड न्युज,भोर, ता. १९: भोर-महाड राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण...

“१५ फूट अजगराचा थरार! करंजगावच्या डोंगरावर भेकराचा मृत्यू, गावात खळबळ”

वन्यजीव रक्षणात सर्पमित्रांचे मोलाचे योगदान; अजूनही सरकारी मान्यता अधांतरी विषय...