Thursday, January 15, 2026

Date:

खेड शिवापूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १७ जण अटकेत, २८ हजारांची रोकड जप्त

- Advertisement -

खेड शिवापूरचा ‘जुगार अड्डा’ उध्वस्त! १७ जणांना ताशाच्या दुनियेतून पोलिसांनी फरफटले बाहेर; २८ हजारांची रोकड आणि पत्ते जप्त

विषय हार्ड न्युज,पुणे ,खेड शिवापूर: खेड शिवापूर येथील हॉटेल गार्गी शेजारील एका इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सुरू असलेल्या तिन पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण १७ जणांना अटक करण्यात आली असून २८,३०० रुपयांची रोकड व ताशाचे पत्ते जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलावडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २४५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपी पुणे व मावळ परिसरातील असून, ते तिन पत्त्याच्या जुगारात सहभागी होते.
प्रत्येक आरोपीकडून १,००० ते ३,००० रुपयांदरम्यानची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आरोपींची नावे व माहिती:
• मकरंद मारुती मेदने (४०), वडगाव मावळ
• अमित सुभाष चिकुदरे (३२), वडगाव मावळ
• वैभव लहाणू थोपटे (३८), नवले ब्रिज, पुणे
• ज्ञानेश्वर गंगाधर बालपांडे (४२), पुणे
• विठ्ठल दत्तात्रय दारवटकर (५५), पुणे
• विनायक विठ्ठल चित्ते (३०), पुणे
• गोकुळ मारुती धोबी (३५), पुणे
• अनिल रामभाऊ माने (३६), पुणे
• फारूक शेख इलियास (४५), पुणे
• लखन लक्ष्मण बसटे (२९), पुणे
• राजकुमार हरिभाऊ शिखरे (४०), पुणे
• सलीम हाजी मुराद शहा (४८), पुणे
• शब्बीर बशीर शेख (३३), पुणे
• योगेश राजू मिस्त्रा (३५), पुणे
• राकेश मनोज राऊत (२८), पुणे
• पंकज दिलीप गायकवाड (३१), पुणे
• अमित अर्जुन राऊत (३०), पुणे

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. घायाळ व पो.उ.नि. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...