Saturday, August 30, 2025

Date:

“बाबांचे हात धरून चालले पाय… प्रेमाने नटलेला ‘फादर्स डे’!

- Advertisement -

युरोकिड्स आनंदनगरमध्ये ‘Walkathon’ आणि खेळांच्या माध्यमातून वडील-चिमुकल्यांचे अनोखे नाते अधिक घट्ट.

विषय हार्ड न्युज,पुणे“आईसारखी माया आणि बाबांसारखा आधार…” या ओळीत मावत नाही इतकं वडिलांचं अस्तित्व विशाल असतं. हीच भावना अधिक गहिर करत युरोकिड्स प्री-स्कूल, आनंदनगर शाखेत फादर्स डे निमित्त शनिवार, १४ जून रोजी एक अनोखा आणि संस्मरणीय कार्यक्रम भरगच्च उत्साहात साजरा करण्यात आला.
         सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात ‘Walkathon with Dad’ या उपक्रमाने झाली. सनसिटी बस स्टॉप येथून सुरू झालेला वॉकथॉन माणिक बाग ,गणेश हॉल येथे संपन्न झाला. लहानग्यांनी आपल्या वडिलांचे हात घट्ट पकडून चालताना नात्यातील प्रेम, विश्वास आणि आनंदाच्या लाटा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेल्या.

          पुढे हॉलमध्ये वडील व मुलांसाठी खास खेळ, सहकार्यावर आधारित उपक्रम, आणि भावनिक बंध घट्ट करणाऱ्या bonding activities आयोजित करण्यात आल्या. हसरा चेहरा, खेळण्यातील उत्साह आणि एकमेकांतील संवाद हे क्षण अविस्मरणीय ठरले. वडील मुलांबरोबर बाल्यसृष्टीत रमले आणि ‘मुलांप्रमाणे जगणं’ याचा आनंद लुटला.

      कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी हलकाफुलका नाश्ता देण्यात आला, जोही एकमेकांसोबत गप्पा मारत, हास्य-विनोद करत घेतला गेला.या सुंदर आयोजनामागे शाळेच्या संचालिका गौरी भगवत यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि सर्व शिक्षकवृंद तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे ठरले. कार्यक्रमाची आखणी अत्यंत बारकाईने केली गेली असून, प्रत्येक पालक व बालकाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात आले.

“फक्त मुलांसाठी नव्हे, तर पालकांसाठीदेखील अशा भावनिक जुळवणीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हेच आमचं ध्येय होतं. या उपक्रमामधून वडिलांना आपल्या मुलांबरोबर नव्याने जोडल्या जाण्याचा अनमोल अनुभव मिळाला,” असे मनोगत गौरी भगवत यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला वडिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वडील आणि त्यांचे लाडके अपत्य या दिवशी आठवणीत राहील असा स्नेहबंध अनुभवून गेले.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...

धायरी व आंबेगाव येथे गौराई साडी ड्रेपिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विषय हार्ड न्युज,धायरी, ता. पुणे – गौरी-गणपती उत्सवानिमित्त महिलांमध्ये...

नवले ब्रिजवर कोंडीत अडकलेले पुणेकर; रखडलेल्या कामावरून नागरिकांचा संताप उसळला.

विषय हार्ड न्युज,पुणे १८– नवले ब्रिज परिसरात रखडलेले बायपासचे...