Thursday, January 15, 2026

Date:

किडनी रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई : ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे २ जूनपर्यंत पोलीस कोठडी.

- Advertisement -

रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण गैरव्यवहारात सात आरोपींनंतर आता आरोग्य अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा.

विषय हार्ड न्युज,पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील बेकायदेशीर किडनी स्वॅप प्रत्यारोपण प्रकरणात ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक व रिजनल ऑथोरायजेशन कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. अजय अनिरुद्ध तावरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांना प्रोडक्शन वॉरंटद्वारे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रकरणाचा आढावा :

• ११ मे २०२२ रोजी तत्कालीन पुणे आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

• तपासादरम्यान, आतापर्यंत सात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले असून, रॅकेटमध्ये बनावट दाते – बनावट गरजू रुग्ण आणि कागदपत्रांच्या आधारे अवैध प्रत्यारोपण केल्याचे निष्पन्न झाले.

• डॉ. अजय तावरे यांनी रिजनल ऑथोरायजेशन कमिटीच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून या अवैध प्रत्यारोपणांना मंजुरी दिली होती, अशी पोलिस तपासातील माहिती आहे.

• या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले डॉ. तावरे हे अन्य एका पोर्शे कार अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.

• पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटद्वारे त्यांना ताब्यात घेत नव्याने अटक केली.तपासाची दिशा आणि पुढील कारवाई :

• या प्रकरणाचा तपास पुणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

• तपासात आणखी काही आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग समोर येण्याची शक्यता आहे. कागदपत्रे, समितीच्या बैठकीचे इतिवृत्त, तसेच साक्षीदारांचे जबाब यांचे बारकाईने परीक्षण सुरू आहे.

न्यायप्रविष्ट तपासात आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ पातळीवरील सहभाग उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. वैद्यकीय विश्वातील विश्वासार्हतेला तडे देणाऱ्या या घटनेचा परिणाम दीर्घकालीन राहण्याची शक्यता आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...