विषय हार्ड न्युज,पुणे: पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आता ज्येष्ठ आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांच्या हाती जाणार आहेत. राज्य शासनाने त्यांची अधिकृत नियुक्ती केली असून, येत्या ३१ मे रोजी ते आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
नवल किशोर राम हे 2003 बॅचचे आयएएस अधिकारी असून, याआधी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील निर्णयक्षमतेमुळे अनेक शासकीय उपक्रमांना वेग मिळाला होता.
नुकतीच त्यांनी पंतप्रधान कार्यालयात कार्यभार सांभाळला होता. तेथूनच त्यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

पुणे महापालिका ही राज्यातील एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका असून या महानगरपालिकेच्या राज्यात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याचे कारण म्हणजे या महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मोठी असल्याने या महानगरपालिकेला राज्यांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे.
एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचे नेतृत्व करण्यासाठी किंवा कारभार पाहण्यासाठी अत्यंत हुशार आणि सक्षम अधिकाऱ्याची गरज असते त्यामुळे नवल किशोर राम हे त्या पदाला साजेशी असे अधिकारी आहेत.