विषय हार्ड न्युज पुणे:प्रेम, त्याग आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम घडवणारे “मेरी दुनिया तू” हे नवीन हिंदी गाणं नुकतंच पॅनोरमा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, रसिकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटवत आहे. एका नवविवाहित भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित हे गीत केवळ प्रेमकथा नाही, तर त्याग, समर्पण आणि देशसेवेचं हृदयस्पर्शी प्रतिबिंब आहे.
गाण्याचं लेखन, संगीत आणि दिग्दर्शन श्रेयस देशपांडे यांचं असून, सह-दिग्दर्शक श्रेयस भागवत यांनी संकल्पनेला धार दिली आहे. उमेश कोरडे यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक दृश्य अधिक जिवंत वाटतं. गायन तन्मय संचेती आणि ईश्वरी ठाकूर यांनी केलं असून, त्यांच्या आवाजातील भावनिकता थेट मनाला स्पर्शून जाते.
चेझन लॉयर आणि गायत्री जैन यांनी प्रमुख भूमिकांमधून नवविवाहित जोडप्याच्या प्रेमातला गोडवा आणि विरहाची वेदना अभिनयातून अप्रतिम मांडली आहे. त्यांच्या पात्रांमधून, सैन्यातील अधिकारी आणि त्याची पत्नी यांचं परस्पर प्रेम, त्याग आणि देशासाठीचं समर्पण प्रभावीपणे समोर येतं.
या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हे रणांगणावरील वीरता जितकं दर्शवतं, तितकंच घरातील स्त्रीच्या मनोबलालाही उजाळा देतं. “मेरी दुनिया तू” हे गीत आजच्या तरुण पिढीला प्रेम आणि देशसेवा यांच्यातील समतोल शिकवणारं प्रेरणादायी उदाहरण ठरतं आहे.
Date:
“प्रेम आणि देशभक्तीचा स्पर्श — ‘मेरी दुनिया तू’ या भावगीतातून सैनिकांच्या बलिदानाला सलाम”.
- Advertisement -