विषय हार्ड न्युज,धायरी (पुणे) –आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते आणि प्रगल्भ समाजदृष्टिकोन असलेले लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने धायरी येथे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना चव्हाण पाटील म्हणाले, “शाहू महाराजांनी सामाजिक समता, शिक्षणाचा हक्क, बहुजनांचा सशक्त सहभाग आणि जातीभेदाविरुद्ध लढा या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज गोरगरीब आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या आणि संधींच्या दारात प्रवेश मिळाला आहे. आजच्या काळातही त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमास वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष धनंजय पाटील, खडकवासला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय अभंग, धायरी गावचे माजी सरपंच गुलाब पोकळे, तसेच धनंजय पोकळे, साहेबराव मते आदी मान्यवर उपस्थित होते.