Friday, July 18, 2025

Date:

पुण्यात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी कपात; कात्रज, धायरी, कोंढवा, आंबेगावसह अनेक भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस कोरडा नळ

- Advertisement -

धरणांमध्ये साठा अपुरा, तापमान चाळिशी पार; महापालिकेचा निर्णय — आठवड्यातून एक दिवस पाणीकपात
‘थेंब थेंब वाचवा, उद्याचा दुष्काळ टाळा!’

विषय हार्ड न्युज,पुणे :शहरात उष्म्याचा पारा ४० अंशांच्या घरात पोहचल्याने पाण्याची मागणी २५ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, धरणांतील मर्यादित साठ्यावर आधारित पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने अखेर पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार, ५ मेपासून टप्प्याटप्प्याने आठवड्यातून एक दिवस विशिष्ट भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता, कोंढवा आदी दक्षिण पुण्यातील भागांपासून या पाणी कपात मोहीमेची सुरुवात होत आहे. या परिसराला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या उपलब्ध साठ्याअभावी अनेक भागांमध्ये ताण निर्माण झाला आहे.

प्रशासनाचे आवाहन:
महानगरपालिकेने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या मागणीतही वाढ झाली असून, ती सुरळीत पार पाडण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षही कार्यरत करण्यात आला आहे.

पाणी कपात दिनविशेष व भागनिहाय यादी:

सोमवार

• बालाजीनगर: श्रीहरी, गुरूदत्त, साईकृपा, गुलमोहर, पवार हॉस्पिटल

• कात्रज: उत्कर्ष सोसायटी, गुजर वस्ती, तलाव लगतचा पूर्व भाग

• कोंढवा: साईनगर, गजानननगर, शांतीनगर, महानंदा, सावंत कॉलनी

मंगळवार

• सनसिटी परिसर: माणिकबाग, समर्थनगर, महालक्ष्मी, विठ्ठलवाडी

• जुनी धायरी: उज्वल टेरेस, दळवीवाडी

• कात्रज/कोंढवा: निरंजन, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, कोलते पाटील

बुधवार

• वडगाव हिंगणे: पेरूची बाग, धबाडी, जाधवनगर, खोरड वस्ती

• कात्रज/कोंढवा: वघजाईनगर, सम्राट टॉवर, शिवशंभोनगर, स्वामी समर्थ नगर

गुरुवार

• धनकवडी/तळजाई: आदर्शनगर, प्रतिभानगर, टिळकनगर, सावरकर सोसायटी

• कात्रज/कोंढवा: सुखसागर नगर, गोकुळनगर, वृंदावननगर

शुक्रवार

• आंबेगाव पठार: महाराणा प्रताप चौक, दत्तनगर, वंडर सिटी, भारती विद्यापीठ

• कात्रज/कोंढवा: पोलीस कॉलनी, जाधवनगर, साईनगर, लक्ष्मीनगर

शनिवार

• कात्रज/कोंढवा: गुजरवाडी फाटा, चैत्रबन, शिवशक्ती नगर, झांबरे वस्ती

रविवार

• कात्रज: आनंदनगर, महादेवनगर

• कोंढवा: आंबेडकरनगर, एच अँड एम सोसायटी, पारगेनगर, अशरफ नगर

ही पाणी कपात चक्राकार पद्धतीने असेल आणि त्या त्या भागात दर आठवड्याला एकच दिवस पाणी बंद ठेवण्यात येईल. पुढील काही आठवड्यांपर्यंत ही योजना राबवली जाण्याची शक्यता असून, नागरिकांनी संयम व सहकार्य ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत माहिती व बदलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...