पुण्यात रस्ते बनले मृत्यूचे रस्ते! वेगेगळ्या रस्त्यावर दोन अपघात; तरुण व महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
एकाच दिवशी दोन मृत्यू – मद्यधुंद मर्सिडीज चालक अद्याप मोकळा; वाघोली अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू.
विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफिकीर आणि बेदरकार वाहनचालकांचा कहर पाहायला मिळाला. ‘हिट अँड रन’चा थरकाप! नवले ब्रिजजवळ मर्सिडीजने दुचाकीस्वाराला उडवलं; वाघोलीत डंपरने महिलेला फरफटत नेलं. अश्या वेगवेगळे अपघात पहावयास मिळाले.
पहिली घटना नवले ब्रिजजवळ घडली. चिंचवड येथील कुणाल हुशार यांना एका भरधाव मर्सिडीज कारने उडवले. या अपघातात कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, कारमधील चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते. मात्र, घटनेनंतर अनेक तास उलटूनही आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली नसल्याने पोलीस आरोपींना वाचवत आहेत का? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
दुसरी घटना वाघोलीतील रोडवर घडली. पार्थ व्हीलाज येथील रुपाली सुरज तिवारी या २७ वर्षीय महिलेच्या दुचाकीला मागून आलेल्या डंपरने धडक दिली. धडकेनंतर डंपरने महिलेला काही मीटर फरफटत नेले. या भीषण घटनेत त्या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले. डंपर चालक शुभम मस्के (२५) व मालक प्रमोद भाडळे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनांनी पुणेकरांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. दररोजच्या अपघातांनी ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुण्यातील रस्ते सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत असून, बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुणेकर करत आहेत.