विषय हार्ड,मुंबई प्रतिनिधी:अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गृहप्रवेश केला. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे वर्षा निवासस्थानी ‘आनंदवन’ निर्माण झालं. अतिशय साधेपणाने, पूजाअर्चा करत फडणवीस कुटुंबीयांनी नव्या पर्वाची सुरुवात केली.
फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यातील वास्तव्यावर अनेक महिन्यांपासून राजकीय चर्चांचे वारे वाहत होते. ‘वर्षा’वर काही अदृश्य अडचणी असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावरून फडणवीसांवर टीका केली होती. मात्र फडणवीसांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, मुलगी दिविजा हिच्या दहावीच्या परीक्षेमुळे आणि बंगल्यावरील डागडुजीच्या कामामुळे प्रवेश उशिरा होत आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेला गृहप्रवेश केवळ एक औपचारिकता नव्हती, तर एका प्रतीक्षेचा आनंददायी शेवट होता. पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पूजेसह गृहप्रवेशाचे क्षण शेअर केले आणि पाहता पाहता हे फोटो व्हायरल झाले. अनेक समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
‘वर्षा’ या शासकीय निवासात प्रवेश करताना फडणवीस कुटुंबीयांनी जणू आपलं नवं घर ‘आनंदवन’च बनवलं. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हा केवळ एका उपमुख्यमंत्र्याच्या गृहप्रवेशाचा क्षण नव्हता, तर एका प्रतीक्षेच्या पूर्णत्वाचा साक्षात्कार होता.