Thursday, January 15, 2026

Date:

“पंढरीची वाट धरूया | टाळ मृदंग गजरूया ||”

- Advertisement -

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जूनला देहू येथून प्रस्थान ठेवणार – यंदा ३४० वा वर्षाचा वारी सोहळा | ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये आगमन

विषय हार्ड न्युज,विशेष प्रतिनिधी,देहू :
“विठ्ठल… विठ्ठल…” च्या गजरात आषाढी वारीचं मंगल आवर्तन सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची प्रतिक्षा संपली असून यंदाचा भव्य भक्तिमार्ग १८ जून २०२५ रोजी देहूतून प्रस्थान ठेवणार आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी या वारीसाठी सज्ज झाले आहेत.

विठू माझा लेकुरवाळा | नाम घेतलं की जीव गोड गोड व्हावा” – ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या ओठी आणि पायात ऊर्जा निर्माण करणारी असते.

यंदा देहू येथील देऊळवाड्यातून पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार असून ६ जुलै रोजी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात ही पालखी पोहोचणार आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे आणि वैभव महाराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याची ठळक ठिकाणांवरील मुक्काम दिनांकासह

• १८ जून (बुधवार) – प्रस्थान: देऊळवाडा, देहू | मुक्काम: इनामदारवाडा

• १९ जून – आकुर्डी (विठ्ठल मंदिर)

• २० जून – पिंपरी, कासारवाडी, पुणे – मुक्काम: नाना पेठ निवडुंगा विठ्ठल मंदिर

• २१ जून – पुणे मुक्काम

• २२ जून – लोणी काळभोर

• २३ जून – यवत (भैरवनाथ मंदिर)

• २४ जून – वरवंड (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर)

• २५ जून – उडंवडी गवळ्याची

• २६ जून – बारामती (शारदा विद्यालय)

• २७ जून – सणसर

• २८ जून – बेलवंडी – प्रथम गोल रिंगण

• २९ जून – इंदापूर – द्वितीय गोल रिंगण

• ३० जून – सराटी

• १ जुलै – अकलूज (माने विद्यालय) – तृतीय गोल रिंगण

• २ जुलै – माळीनगर – प्रथम उभं रिंगण

• ४ जुलै – बाजीराव विहीर – द्वितीय उभं रिंगण

• ५ जुलै – वाखरी

• ६ जुलै (रविवार) – पंढरपूर – पादुका अभंग आरती व श्री संत तुकाराम मंदिरात आगमन

वारीची खास वैशिष्ट्ये

• ३४० वा पालखी सोहळा – परंपरेला जोडणारा भक्तीचा महोत्सव

• तीन गोल रिंगण व दोन उभे रिंगण – सोहळ्यातील महत्त्वपूर्ण धार्मिक परंपरा

• वारकऱ्यांचा अनुशासनबद्ध आणि पर्यावरणपूरक सहभाग

• पायी चालणाऱ्या भक्तांची ऊर्जा – श्रद्धेची शुद्धता आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण

“पंढरपूरची वाट म्हणजे आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग”, असं म्हणणारे वारकरी आपली व्यथा, भक्ती आणि आनंद घेऊन या वारीत सामील होतात. आषाढी वारी म्हणजे एक सजीव चालतं भक्तिसंगीत असतं. टाळ-मृदंग, अभंग, हरिपाठ आणि एकमेकांवरील आत्मीयता हे या वारीचे खरे वैभव आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...