विषय हार्ड न्युज, पुणे:धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भविष्यातील यशाची दिशा दाखवणारे, भावनिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रांत झळकलेले यशस्वी माजी विद्यार्थी आणि मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत, मुलांच्या मनात “आपणही काही करू शकतो” हा विश्वास जागवणारा संवाद झाला.
मॉडर्न पँनटेथलॉन स्पर्धेतील शिवछत्रपती पुरस्कार विजेते विराज परदेशी आणि सीए नचिकेत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अपयशाला घाबरू नका, प्रयत्न थांबवू नका हा मोलाचा सल्ला दिला. PSI पदी निवड झालेल्या ज्ञानेश्वरी मोरे यांच्या आईने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “शाळेचे प्रत्येक क्षण तुमचे भवितव्य घडवतात, तेव्हा त्यांना हलकं घेऊ नका” असे सांगून भावनिक आधार आणि प्रेरणा दिली.
शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, मेहनतीची जाणीव आणि उच्च ध्येयाची प्रेरणा रोवली – जी त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण संचालक अनिकेत चव्हाण ,धनराज चव्हाण, सचिव प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, सल्लागार जी.बी. विद्यासागर सर, प्राचार्य सुनिता चव्हाण, विलास खाडे, माधव काकडे,डॉ. एस. एम. कांबळे,मदन सूर्यवंशी, दीपक खेडकर, विकास राजाराम कुंभार,PSI ज्ञानेश्वरी मोरे, मॉडर्न पँनटेथलॉनमधील शिवछत्रपती पुरस्कार विजेते विराज परदेशी, व CA नचिकेत शिंदे यांची उपस्थिती लाभली.