विषय हार्ड न्युज,पुणे: वडगाव खुर्द येथील महालक्ष्मी मंदिरात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्व. हरिश्चंद्र आण्णा दांगट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक हितासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या दांगट यांच्या कार्याचा आदर म्हणून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सामाजिक सेवा सुरू करण्यात आली आहे.

उष्णतेच्या तीव्रतेत प्रवाशांना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने पाणपोई स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीच्या हस्ते, विशेषतः रुद्रप्रताप शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास केतन शिंदे, देवेंद्र शूर, धनश्री शिंदे, रामचंद्र पोळेकर, राजू शिंदे, स्वामिनी शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे योगदान आणि सहकार्य या सामाजिक कार्यात मोलाचे ठरले.
ही पाणपोई ही केवळ पाण्याची सुविधा नाही, तर एक स्मरणचिन्ह आहे त्या व्यक्तीच्या समाजासाठी झिजलेल्या आयुष्याचे. यामधून नव्या पिढीने समाजासाठी झपाटून काम करण्याची प्रेरणा घ्यावी, हा आयोजकांचा खरा हेतू आहे.