Saturday, July 19, 2025

Date:

धिंगाणा, दहशत आणि बेशिस्तीचा थरार : माणिकबागमध्ये दोन तरुणांचा ‘रंगीत’ हैदोस!

- Advertisement -


दारूच्या धुंदीत कपडे फेकले, महिलांशी अर्वाच्य वर्तन, वॉचमनला मारहाण; सिंहगड पोलिसांची दमदार कारवाई!

विषय हार्ड न्युज,पुणे (प्रतिनिधी) –
सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथे शुक्रवारी सायंकाळी दोन तरुणांनी दारूच्या धुंदीत रस्त्यावर अक्षरशः धिंगाणा घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दुकानासमोरच कपडे काढत विकृत प्रकार केले, महिलांशी अर्वाच्य वर्तन करत दुकानदाराला शिवीगाळ करत घेतलेल्या वस्तूंचे पैसेही न देता आरडाओरडा सुरू केला.

ही दोन्ही तरुण मंडळी इतकी बेशिस्त झाली होती की, त्यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाला थेट नो-पार्किंग झोनमध्ये दोन गाड्यांच्या मध्ये उभी करून वाहतूक कोंडीही निर्माण केली. जवळपास एक तास हा तमाशा सुरू होता, त्यामुळे संपूर्ण माणिकबाग परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी सोसायटीच्या वॉचमनला देखील मारहाण करत त्यांनी गेटवरच सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली. स्थानिक दुकानदार व नागरिकांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिसांना कॉल केला. सिंहगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल होताच, तरुणांनी पोलिसांशीही उद्धटपणे वागण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ काढण्याची धमकी दिली.

मात्र पोलिसांनी दक्षता दाखवत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात हलवले. सदर तरुणांनी घेतलेल्या कपड्याचे पैसेही दिले नसल्याने दुकानदारांनी तक्रार दाखल करणार आहे

सध्या पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.
या प्रकरणामुळे काही काळासाठी माणिकबाग परिसरात खळबळ उडाली होती. रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...