विषय हार्ड न्युज,पुणे २७एप्रिल :- भवानी पेठेतील गुरुनानक नगर भागात रविवारी सिंधी समाजातील हर्ष केसवाणी आणि निकिता केसवाणी यांच्या घरावर मुस्लिम समाजातील काही युवकांनी संघटित स्वरुपात भीषण हल्ला केला. हॉर्न वाजविण्याच्या किरकोळ वादाचे निमित्त साधून दगडफेक, दगडीने मारहाण आणि अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शोएब उमेर सैय्यद आणि त्याचे ८ ते १० साथीदार यांनी घरात घुसून हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात तीव्र तणावाचे वातावरण पसरले आहे. हिंदू समाजाने अशा जातीय कुरापती व हिंसक कारवायांचा तीव्र निषेध केला असून, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
हिंदू समाजावर अशा प्रकारे हेतुपुरस्सर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.