नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण .
विषय हार्ड न्युज,नवी मुंबई, २६ एप्रिल:-
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने मुलांच्या अमली पदार्थ प्रकरणातील त्रास सहन न झाल्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव गुरुनाथ चिंचकर (रा. गुरुकिरण सोसायटी, एनआरआय पोलीस ठाण्याच्या मागे) असे आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास चिंचकर यांनी आपल्या कार्यालयात ९ एमएमच्या वैयक्तिक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडली.
यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रकरणाचे सविस्तर तपशील:
काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत अमली पदार्थ प्रकरणात २०० कोटींच्या ड्रग्जसह मोठी कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणात गुरुनाथ चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा सहभाग समोर आला होता.
- एक मुलगा सध्या तुरुंगात आहे, तर दुसरा फरार आहे.
- या प्रकरणी चिंचकर यांना एनआरआय पोलीस ठाण्यात वारंवार चौकशीसाठी बोलावलं जात होतं.
सततच्या चौकशीच्या दबावामुळे चिंचकर मानसिक तणावात होते.
आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याचे समजते.
पोलीस तपास सुरू:
या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
चिंचकर यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामागे नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.