Friday, September 5, 2025

Date:

“अक्षय तृतीयेला महिलांना ३००० रुपयांचा दुहेरी हप्ता; ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक आधार”

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,पुणे, २६ एप्रिल :–

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असलेल्या महिलांसाठी आनंदाची घोषणा केली आहे.योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये
३० एप्रिल २०२५ रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खात्यात जमा होणार आहेत.

सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे उशीराने मिळणार होता.
मात्र आता एप्रिल व मेचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अनेक महिलांना
आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे.

पात्रता:
या योजनेचा लाभ खालील प्रकारच्या महिलांना मिळणार आहे:

  • विवाहित महिला
  • विधवा महिला
  • घटस्फोटित महिला
  • निराधार महिला
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला

अर्जाची प्रक्रिया:
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन
“नवीन नोंदणी” करावी. अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक तपशील
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट साईज छायाचित्र

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांच्या आयुष्यात थोडा सुखाचा श्वास भरला जाणार आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आर्थिक हातभार लागल्याने बहिणींच्या संघर्षाला नव्या आशेची वाट मिळेल,
अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या चैतन्य लांडगेचे यश.

विषय हार्ड न्युज पुणे : चेन्नई येथील नेहरू इंडोर...

मराठा आरक्षण संघर्षाला यश : मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य, काहींवर मुदत.

विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे...

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...