Friday, July 18, 2025

Date:

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उंच भरारी! बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा ‘सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५’ फॅशन शो दिमाखात संपन्न

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,चिंचवड :पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेला ‘सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५’ हा भव्य फॅशन शो एलप्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या सभागृहात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी खादी व ज्युट या पारंपरिक साहित्याचा वापर करत सादर केलेल्या नवकल्पनांमुळे उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे, परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम, प्राचार्य डॉ. संगीता जगताप, विभागप्रमुख प्रा. प्रीती सदाशिव जोशी तसेच अनेक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व प्राचार्य यांची उपस्थिती लाभली होती.

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन इंडस्ट्रीचा अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यातील प्रतिभेला योग्य वाव मिळावा या हेतूने या शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले संग्रह विविध थीमवर आधारित होते.
‘कार्निवल्स ऑफ कलर्स’ या संग्रहासाठी मोहिनी खेमनार, समिक्षा नवले आणि रोनीत तिकोणे यांना सर्वोत्तम संग्रह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ‘अर्थ एलिगन्स’ या सादरीकरणासाठी आकांक्षा आखाडकर, कावेरी हिवरेकर, दीपाली गायकवाड आणि दिव्या पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट डिझाईन पुरस्काराच्या श्रेणीत ‘स्टिचरी फ्लोरेन्स’ साठी निवेदिता चव्हाण, स्मिता पडुल आणि अवंतिका मगरे यांनी बाजी मारली, तर ‘लँड्स ऑफ डेनिम’ मधील मनीषा कोरे, कल्याणी गोसावी व सायली सरादे यांच्या डिझाइन्सचे कौतुक झाले.
नाविन्यपूर्णतेचा विशेष पुरस्कार ‘ट्रीब ट्विस्ट’ सादरीकरणासाठी तन्वी बिबावे आणि दीपाली चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘देसी चार्म खादी’ या संकल्पनेसाठी सर्व MVOC PG विद्यार्थ्यांना ज्युरींचा विशेष पुरस्कार मिळाला.

या शोच्या आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा. प्रीती सदाशिव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी आपल्या खास शैलीत केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

‘सृजन – द क्रिएटिव विंग्स’ हा शो केवळ फॅशनचा सोहळा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, आत्मविश्वासाला आणि उज्वल भविष्यास चालना देणारे एक स्वप्नवत व्यासपीठ ठरले.’

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...