चला तरुणांनो, विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व नागरिकांनो — या महाराष्ट्र दिनी निरोगी जीवनशैलीचा संकल्प करूया आणि धावून आरोग्याकडे वाटचाल करूया!”
विषय हार्ड न्युज पुणे:महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड सिटी परिसरात “पॉवरफुल अल्ट्रा रनर्स”च्या वतीने १ मे रोजी “महाराष्ट्र दिन विशेष रन” या आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगणक, मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
“मोरे इक्वेस्ट्रेन – स. नं. २, नांदेड सिटी आऊट गेट” येथे सकाळी ६ वाजता हा विशेष रन सुरू होईल. या उपक्रमात युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुरेश विश्वकर्मा देखील यामध्ये सहभागी होणार असून, धावण्याच्या माध्यमातून आरोग्यविषयक संदेश प्रसारित केला जाणार आहे. सायकलिंग, नियमित धावणे आणि सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व या उपक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात येणार आहे.
पॉवरफुल अल्ट्रा रनर्सच्या वतीने नागरिकांना, शाळांना, महाविद्यालयांना आणि युवक-युवतींना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या विशेष रनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि निरोगी आयुष्याच्या दिशेने पहिला पाऊल टाकावे.
हा उपक्रम नांदेड सिटी आणि सिंहगड रस्ता परिसरात आरोग्यविषयक सकारात्मक संदेश पोहोचवण्यास मदत करणार आहे.