‘रोजगार मेळाव्यातून राष्ट्रनिर्मितीस नवे बळ’
विषय हार्ड न्युज पुणे:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे देशभरात भरवण्यात आलेल्या १५व्या रोजगार मेळाव्यातून ५१ हजाराहून अधिक युवकांना केंद्र सरकारच्या विविध विभागांत नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. पुण्यातील ‘यशदा’ येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे-१ यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण व रसायने व खते मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून नव्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दृष्टिबाधित महिला व्हॅलेंटिना कांडलकर आणि दिव्यांग श्रेयांश शर्मा यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “युवा राष्ट्रनिर्मितीचा कणा आहेत. त्यांच्या सामर्थ्यावर भारताचा विकास आणि जागतिक स्तरावरचा प्रभाव वाढतो.
दरम्यान पहलगाम येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.