Friday, September 5, 2025

Date:

ग्रीष्मकालीन गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग क्षेत्राची उभारणी

- Advertisement -

विषय हार्ड न्युज, पुणे:-उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पुणे विभाग, मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या व्हीआयपी साइडिंगजवळ विशेष होल्डिंग एरिया उभारला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांची हालचाल सुरळीत करणे, अनावश्यक गर्दी टाळणे आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवास अनुभव सुनिश्चित करणे हा आहे.

होल्डिंग एरियामध्ये उपलब्ध सुविधा:

  • पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि पंख्यांची सुविधा
  • पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र पोर्टेबल शौचालये
  • डिजिटल डिस्प्ले बोर्डद्वारे माहिती सेवा
  • मदत कक्ष व तातडीच्या मदतीसाठी कर्मचारी

गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त:

  • २५ आरपीएफ कर्मचारी व १५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात
  • १ वाणिज्य निरीक्षक/पर्यवेक्षक आणि १ अधिकारी नियमित निरीक्षणासाठी
  • तिकिट तपासणी होल्डिंग एरियामध्येच
  • नियोजित रांगेतून आणि टप्प्याटप्प्याने प्लॅटफॉर्मवर प्रवेश

उन्हाळी विशेष गाड्यांसाठी सर्वसाधारण श्रेणीतील तिकिट विक्रीही गर्दीच्या स्थितीनुसार नियंत्रित केली जात आहे.

पुणे विभाग, मध्य रेल्वे, प्रवाशांच्या सुरक्षितता व सोयीसाठी कटिबद्ध असून, भविष्यातही असेच उपाययोजना प्रभावीपणे राबवत राहील.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या चैतन्य लांडगेचे यश.

विषय हार्ड न्युज पुणे : चेन्नई येथील नेहरू इंडोर...

मराठा आरक्षण संघर्षाला यश : मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य, काहींवर मुदत.

विषय हार्ड न्युज पुणे:मराठा समाजासाठी सुरु असलेला मनोज जरांगे...

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...