“शपथ आरोग्याची, सुरुवात स्वतः पासून-कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची तंबाखू मुक्ततेकडे वाटचाल”..
विषय हार्ड न्युज,पुणे:-राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्यांतर्गत, पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात “वाचाल तर वाचाल” वाचनप्रेरणा उपक्रम आणि “तंबाखू मुक्त कार्यालय” शपथ विधी उत्साहात पार पडले.
या उपक्रमांचे आयोजन सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. “वाचाल तर वाचाल” या प्रेरणादायी उक्तीचा संदर्भ देत, त्यांनी मोबाईल युगात वाचनाचे महत्व अधोरेखित केले. वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर दुपारी ३ वाजता डॉ. दत्ता कोहिनकर लिखित “सुखी जीवनाचा पासवर्ड” या प्रेरणादायी पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. वाचनानंतर, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय तंबाखूमुक्त ठेवण्याची शपथ घेत सकारात्मक वातावरणात हा उपक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक जीवन मराळे, उप अधीक्षक मोनिष बधे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.