विषय हार्ड न्युज पुणे:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे दोन पर्यटक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या साक्षीदार असलेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीने, आसावरी जगदाळे हिने काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग उलगडला.

- “मी, माझे आई-वडील आणि मित्रमंडळी बायसरण व्हॅली (मिनी स्वित्झर्लंड) येथे पर्यटनासाठी गेलो होतो.”
- “अचानक डोंगरातून गोळीबार सुरू झाला. स्थानिक लोक म्हणाले, ‘हे शेरामुळे होतं’ – पण नंतर लक्षात आलं की ही खरी दहशतवादी कारवाई होती.”
- “आम्ही टेंटमध्ये लपलो. तिथं दहशतवाद्यांनी सर्वांना गुडघ्यावर बसवलं आणि ‘अजान पढो’ असं म्हणत धमकावलं.”
- “वडिलांनी शांतपणे उत्तर दिलं, ‘आप बोलो, हम करते हैं’, पण त्याच वेळी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.”
- “कौस्तुभ काकांनाही गोळ्या लागल्या. आमच्यासमोरच दोघांचा मृत्यू झाला. आम्ही कसाबसा पळून जिव वाचवला.”
दहशतवाद्यांनी निवडक पुरुषांवर गोळ्या झाडल्याचं आसावरीने सांगितलं. आर्मी आल्यावर जखमी पर्यटकांना वाचवण्यात आलं.
दरम्यान संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.