विषय हार्ड न्युज,पुणे :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव बुद्रुक येथे लवकरच तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून सुरू होणार असून, संपूर्ण वडगाव परिसरातील गल्ल्यांतून जाऊन पुन्हा त्या स्मारका जवळ विसर्जित होणार आहे.
या मोर्चात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. मोर्चा पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्धपणे व राष्ट्रभक्तीच्या घोषणांसह पार पडणार आहे. ‘संभाजींच्या वंशजांना झुकवत नाही’, ‘भारत मातेचा जयघोष अखंड राहो’, आणि ‘अतिरेक्यांचा कायमचा नाश होवो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “हा मोर्चा केवळ निषेधासाठी नाही, तर एकजुटीचा, देशप्रेमाचा आणि संभाजी महाराजांच्या विचारांना सलाम करण्याचा आहे.”
संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्याचे ठरवले आहे.
वडगाव बुद्रुकमध्ये सध्या राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन अतिरेक्यांविरुद्धचा आवाज बुलंद करत आहे.