



पहलगाम हल्ला : अडकलेल्या १८३ महाराष्ट्रतील पर्यटकांसाठी दोन विशेष विमाने, राज्य सरकारचा खर्च– केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची महिती.
विषय हार्ड न्युज पुणे,२१एप्रिल:-पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १८३ पर्यटकांना आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही मोफत व्यवस्था राज्य सरकारच्या खर्चातून करण्यात आली आहे.
इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांच्या विमानांतून हे पर्यटक गुरुवारी श्रीनगरहून मुंबईत दाखल होणार आहेत. अडकलेल्या इतर पर्यटकांसाठीही पुढील टप्प्यांत व्यवस्था केली जाणार आहे.
मोहोळ यांच्या कार्यालयात अजूनही नागरिकांचे मदतीसाठी फोन येत असून, त्यांनी २४ तास कार्यरत वॉर रूम सुरू केली आहे. “शेवटचा पर्यटक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचा प्रयत्न सुरू राहील,” अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.
