विषय हार्ड न्युज,पुणे, २३ एप्रिल – महापारेषणच्या ४०० केव्ही जेजुरी टॉवर वीजवाहिनीत बुधवारी रात्री ९.४५ वाजता बिघाड झाल्यामुळे पुण्यात कोथरूड, हडपसर, पद्मावती, वडगाव धायरी, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, फुरसुंगी आदी भागातील सुमारे ४.५७ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

अतिउष्णतेमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, महापारेषणच्या वाहिन्यांवर ताण निर्माण झाला होता. संभाव्य धोका टाळण्यासाठी ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) प्रणाली सक्रिय झाली आणि महत्त्वाची उपकेंद्रे बंद पडली.
महापारेषणकडून पर्यायी मार्गाने टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, रात्री ११.३० वाजेपर्यंत काही भागात वीज परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.