Sunday, July 20, 2025

Date:

पहलगामवर रक्ताचा डाग…!निष्पाप जीवांना मारणाऱ्या त्या दहशतवाद्यांचा चेहरा आला समोर…

- Advertisement -

निष्पाप पर्यटकांचा बळी, महाराष्ट्रातील सहा कुटुंबांवर दु:खाचं ढग

विषय हार्ड न्युज,पुणे:-पहलगाम… निसर्गाचा शांत कुशीत विसावलेलं स्वर्गासारखं ठिकाण. मात्र मंगळवारी दुपारी इथे घडलेली एक घटना निसर्गाच्या सौंदर्याला काळवट छाया देऊन गेली. दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, आणि देश पुन्हा एकदा हादरला.

या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी; पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तसेच पनवेलचे दिलीप देसले — या सहाजणांनी आपल्या आयुष्याची शेवटची सहल अनुभवली… मृत्यू त्यांना इथल्या डोंगरदऱ्यांत गाठून गेला.

हल्ला इतका भयानक होता की, निवडून निवडून पर्यटकांना लक्ष्य केलं गेलं. ही रेखाटलेली क्रूरता आतून हादरवणारी आहे. बैसारन खोऱ्यात, जिथे फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकू यायचा, तिथे आता बंदुकीचे आवाज आणि आक्रोश घुमले.

दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो समोर आला आहे. त्याच्या हातात बंदूक आहे, पण चेहरा अस्पष्ट… हा फोटोच किती बोलका आहे — क्रौर्याचं ते शस्त्र, पण माणुसकीचा लवलेश नाही.

हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. एनआयएची टीम श्रीनगरमध्ये दाखल झाली असून, आर्मी, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतो आहे.

तत्पूर्वी, हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची स्केचेसही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्कतेने काम करत आहेत.

हल्ल्यानंतर मृत पर्यटकांचे मृतदेह पहलगाममधील हॉस्पिटलमधून श्रीनगरला हलवण्यात आले आहेत. त्या काळजाला चिरत गेलेल्या गोष्टी, आता केवळ आठवणींमध्ये उरतील…

आज महाराष्ट्रातील सहा घरांत केवळ फोटो उरलेत, आठवणी उरल्या आहेत… आणि एकच प्रश्न — “पर्यटनाच्या नावाने निघालो… मृत्यूच्या तावडीत कसे सापडलो?”

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...