पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रावर शोककळा
विषय हार्ड न्युज, पुणे:-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
डोंबिवलीच्या अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पनवेलचे दिलीप देसले हेही या हल्ल्यात बळी गेले.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील एस. बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोबीत पटेल हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने संपूर्ण राज्य हळहळले असून, हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून जखमींना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
